नायगांव तालुक्यात. रेती नंतर आता मुरुमाचीही तस्करी वाढली--- महसूल विभागाच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थापन केलेले पथक कागदावर असतांनाच.नायगांव च्या तहसीलदारांनीही न...


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थापन केलेले पथक कागदावर असतांनाच.नायगांव च्या तहसीलदारांनीही नव्याने पथके गठीत केली. तरीही चोरटे महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रेतीची चोरी करुन वाहतूक तर करतच आहेत.पण आता मुरुमाणीही मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करुन वाहतूक होत आहे. त्यामुळे या मुरुमाच्या अवैध उत्खननाला आणि रेतीच्या चोरट्या वाहतुकीला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा छुपा पाठींबा तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. 

        नायगांव तालुक्यात रेती चोरट्यांनी मोठा उच्छाद मांडला असून कुंटूर.व नरसी परिसर हा चोरट्यांचा अड्डा बनला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्रीला रेतीची चोरी करुन वाहतूक करत आहेत. रात्रीला बिनधास्तपणे रेतीची चोरी करुन विना पावती वाहतूक होत असतांना गस्तीवर असलेल्या कुंटूर.नायगांव पोलीसांनी आजपर्यंत एकाही वाहणावर कारवाई केली नाही. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. कुंटूर पोलीस तर कारवाई करतच नाहीत पण नायगांव पोलीसांनी रात्रीला नायगांव शहरात रेती घेवून येणाऱ्या काही माफीयांच्या टिप्परला संरक्षण देण्याची भुमिका घेतल्याचे दिसून येते. की काय ?

      महसूल व पोलीस विभागाच्या नाकावर रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवरुन बिलोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी रेतीच्या चोरीला आणि अवैध वाहतुकीला प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठी नायब तहसिलदारांच्या नियंत्रणाखाली दि. २८ जुलै २०२० रोजी पथके गठीत करुन रात्रीला होणाऱ्या रेती चोरट्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. हि पथके आजपर्यंत कागदावरच होते. त्यामुळे दै.विविध वर्तमान पत्रामध्ये याबाबत चे वृत प्रकाशीत केल्यानंतर तहसीलदार गजानन शिंदे यांनी नव्याने मागच्या महिन्यात तीन नायब तहसीलदार व चार मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथके गठीत केली होती. मात्र या पथकाने आजपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. 

       उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थापन केलेले पथक कागदावरच राहिल्यानंतर आता नव्याने तहसीलदारांनी पथके स्थापन केली आहेत पण या पथकांनी मागच्या दिड महिन्यांपासून एकही कारवाई केलेली नाही. त्यामुळे रेतीची तर रात्रीला बिनदिक्कतपणे वाहतूक होत असून आता मुरुमाचीही प्रचंड तस्करी वाढली आहे. नायगांव शहरात जागोजागी मुरुमाचे आणि रेतीचे ढिगारे दिसून येत आहेत. सर्व काही आलबेल चालू असल्याने महसूल विभागाच्याच अधिकाऱ्यांचा या सर्व प्रकाराला पाठींबा तर नाही ना अशी शंका येत आहे. 

-


दोन दिवसापूर्वी रात्रीला नायगांव शहरात रेतीची वाहतूक करणारे वाहण काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले होते. त्यामुळे वाहण मालकाने आम्ही सर्वच यंत्रणेला अर्थिक पुरवठा करुनच रेतीची वाहतूक करत असल्याचे सांगितले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel