महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना:
कडक तपासणी आणि सीसीटीव्ही: प्रत्येक परीक्षार्थीची बारकाईने तपासणी करूनच त्याला परीक्षा दालनात प्रवेश दिला जाईल
. केंद्रसंचालकांनी स्वतः सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करणे अनिवार्य आहे . महिला परीक्षार्थींची सुरक्षा: मुलींची तपासणी ही बंद वर्गखोलीत केवळ महिला कर्मचाऱ्यांमार्फतच केली जावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत
. लाईव्ह मॉनिटरिंग (झूम वेबकास्ट): परीक्षेत पारदर्शकता राखण्यासाठी बैठे पथक प्रमुख 'झूम' लिंकद्वारे परीक्षेचे पूर्णवेळ शूटिंग करतील
. हे शूटिंग 'HSC & SSC EXAM MONITORING 2026' या विशेष व्हॉट्सॲप ग्रुपवर मॉनिटर केले जाईल . मोबाईलवर बंदी: परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांना मोबाईल आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे
. तसेच, एका बेंचवर (ड्युएल डेस्क) केवळ एकाच विद्यार्थ्याला बसवण्याची जबाबदारी केंद्रसंचालकांवर असेल . अनाधिकृत व्यक्तींवर कारवाई: परीक्षा कालावधीत केंद्रावर शाळेचे कर्मचारी असले तरी, जर ते परीक्षेच्या कामात नसतील, तर त्यांना केंद्राबाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. आदेश न मानल्यास भारतीय न्याय संहितेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल
.
यंत्रणेला सक्त ताकीद

COMMENTS