नांदेड, दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर त्रुटी आढळून आली. तसेच परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांनी आपले ओळखपत्र जवळ न ठेवल्याची बाबही निदर्शनास आली. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक ड्युअल डेस्कची व्यवस्था नसल्याचेही आढळून आले. ही बाब अत्यंत गंभीर असून, संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्या आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अनेक संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे थेट नियंत्रण करण्यात येत असून त्यासाठी दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. इयत्ता 12 वी व 10 वीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सीसीटीव्ही व ड्रोनच्या माध्यमातूनही चित्रीकरण करण्यात येत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
नरेंद्र येरावार उमरी प्रतिनिधी सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याचे युग आहे. माणूस पैसा, पद, प्रतिष्ठा मिळवण्यात व...
-
नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावस...

COMMENTS