नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी मांजरम येथे विविध कार्यक्रमांने साजरी करण्यात आली.
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी गुरूदेव सेवा मंडळ दर वर्षी साजरी करते.हनुमान मंदीर येथे गावातील भजनी मंडळाच्या वतीने सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.गुरूदेव मंडळाचे सेवाधिकारी साहेबराव जाधव यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. दत्तात्रय गायकवाड, रयत क्रांतीचे पांडुरंग शिंदे, बालाजी माली पाटील, शिवाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तदनंतर महाराजांच्या भारदार गिताचे. गायन विनायक पाटील, अशोक मंगनाळे, विठ्ठल जांभळे, परमेश्वर केते,बाबु गुरूजी शिंदे, विकास भुरे, माणिक जाधव यांनी सादरीकरण केले तर विश्वनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, देवराव केते, बाबा केते , राजेश वाकरडे, संतोष जाधव यांच्या सह गुरू देव भजनी मंडळ, विठ्ठलेश्वर भजनी,महात्मा बसवेश्वर भजनी मंडळा सह अनेक जणांची उपस्थिती होती.
COMMENTS