नांदेड जिल्हा प्रतिनिधी:-शेख आरीफ
नांदेड:-दि.2.जनता माहिती अधिकार समीती महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलय नांदेड येथे बिलोली शहरातील हड्डी कारखाने बंद करण्यासाठी जनता माहिती अधिकार समीतीच्या प्रदेश अध्यक्षा वैशाली हिंगोले हे उपोषनास बसले असून बिलोली शहारा जवळील हड्डी कारखान्यामुळे बिलोली शहरातील साठेनगर,इंदिरानगर,आंबेडकर नगर, व तसेच खंडेगाव, कोंडलापूर,सावळी,गावाच्या परिसरात जीवघेणी दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्यामुळे परिसरातील जनतेचे आरोग्य बाधित होत असून या परिसरात दिवसेंदिवस हड्डी कारखान्यात वाढ होत असल्यामुळे यात गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळल्या जात असून या मुळे दमा छातीचे विकार पोटाचे विकार वाढत आहेत. दि. 8/10/2020व 21/10/2020 रोजी प्रशासनास या संदर्भाचा अर्ज देऊनही कोणतीच कार्रवाही झाली नसल्यामुळे आज उपोषणस बसावे लागले आहे अशी खंत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा वैशाली हिंगोले यांनी सांगितले आहे. त्यांच्या सोबत नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष मारोती शिकारे, नांदेड उत्तर अध्यक्ष शंकर सिंह ठाकूर, नांदेड शहर अध्यक्षा मीना नारळे या उपस्थित होत्या.
COMMENTS