माजलगाव (प्रतिनिधी)
सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याने गाळप हंगाम 2019 -20 मध्ये एकूण गाळप 145508.671 मे.टन ऊसाचे गाळप करून 140575 क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले असून कारखान्याने दि.25/12/2019 ते दि.05/03/2020 पर्यंतच्या ऊस बिलाचे हप्ते 2156/- रु. प्रति टन प्रमाणे या अगोदर बँकेत वर्ग केलेले आहे. माजलगाव तालुक्यातील तसेच कार्यक्षेत्रातील इतर कारखान्यापेक्षा गाळप क्षमता व विविध उपपदार्थांचे कोणतेही प्रकल्प नसताना माजी आमदार तथा चेअरमन बाजीराव सोनाजीराव जगताप यांनी शेतकऱ्यांचे हित जपत दिपावली सणानिमित्त व कोविड 19 कोरोना सारख्या महाभयंकर महामारी रोगामुळे लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना ऊस बिलाचा रु.150/- ने तिसरा हप्ता काढला आहे.
कारखान्याने गाळप हंगाम 2019-20 मधील दिनांक 23/11/2019 ते दि.24/12/2019 पर्यंत च्या एकूण 36975.678 मे. टन उसाचे गाळप केलेले असून यामध्ये 942 शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे हप्ते यापूर्वी 2500/- रु. प्रति टन या प्रमाणे दिलेले आहे.
कारखान्याचे दि.25/12/2019 ते दि.05/03/2020 पर्यंत एकूण 108532.993 मे. टन उसाचे गाळप झालेले असून यामध्ये एकूण 2670 शेतकऱ्यांचे ऊस बिलाचा तिसरा हप्ता 150/- रु. प्रति टन प्रमाणे एकूण रु. 16280029/- बँकेत वर्ग केले असून उर्वरित राहिलेल्या ऊस बिलाच्या रकमेचे टप्प्याने लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे व्हा.चेअरमन मोहनराव जगताप यांनी सांगितले याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक महेश सगरे सचिव चंद्रकुमार शेंडगे उपस्थित होते.
तरी सर्व शेतकऱ्यांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित बँकेत बिल जमा करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
COMMENTS