धर्माबाद (अहमद लड्डा) सोमवारी धर्माबाद च्या तहसील कार्यालयासमोर धर्माबाद टेंट हाऊस असोसिएशनच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. तंबू मंडप सजावटकार, मंगल कार्यालय व बैंकेट हॉल, लाइट व डीजे ध्वनी, केटरिंग व आचारी, फ्लॉवर डेकोरेटर्स, इन्वेंट मैनेजमेंट, जिल्हा छायाचित्रण, घोडा व बग्गी ह्या व्यवसायीकानी विविध मागण्यांसह सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन केले.बँड, वेडिंग कार्ड प्रिंटिंग, पुरोहित आणि ऑर्केस्ट्रा संगीत कलावंत संबंधित सर्व व्यावसायिकांनी जोरदार घोषणाबाजी करत येथे हे धरणे आंदोलन केले. ऑल महाराष्ट्र टेंट वेलफेअर्स संस्था व टेंट, मंगल कार्यालय, केटरर्स, डेकोरेटर्स, ओनर्स संघटना नांदेड यांच्यासह या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात हे धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून, वरील असोसिएशनच्या लोकांना कोविड - 19 मुळे सर्व बेरोजगार झाले आहेत व त्यांना समस्या भेडसावत आहेत आणि कुटुंबावर संकट आले आहे. कोरोना आजारामुळे कुटुंबावर संकटाची वेळ आली तरी ही दुसरा व्यवसाय नसल्याने आमचे होते ते व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. म्हणूनच आमच्या दुकानाचे भाडे निघणे ही अवघड झाले आहे. कोणताही समान व्यवसाय नसल्यामुळे सर्वांमध्ये उपासमारी चे संकट आले आहे. कोविड - 19 च्या वेळी केंद्र सरकारकडून 200 लोकांना शुभ कार्यासाठी परवानगी देण्यात आली आणि राज्य सरकारकडून केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली होती. राज्य शासनाला विनंती आहे की 500 लोकांना मान्यता द्यावी आणि कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी. तरच आमच्यावर व कुटुंबावरचा अन्याय दूर होईल. म्हणूनच या विषयावर तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर धर्माबाद टेंट मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री शुभम सारडा, उपाध्यक्ष साईनाथ गौड , सचिव सूर्यकांत येरावार, कोषाध्यक्ष साईनाथ रोमलवार आणि खुद्दूसभाई, कपिल हातगाळे, विनायक फुलारी, नरसिमलू बोन्द्रडकर, भास्कर गौर आणि साईकिरण मदीकुंटावार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS