नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
आखिल भारतीय ब्राम्हण महासंघ युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी जबाबदारी कु.संपदा राजेश कुलकर्णी सुजलेगांवकर यांच्याकडे देण्यात आली असून नांदेड जिल्ह्यात ही आघाडी समाज संघटनेसाठी जोमाने कामाला लागेल अशी आशा ब्राम्हण महाशिखर परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांनी व्यक्त केली .
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ राज्याचे कार्या अध्यक्ष तथा ब्राम्हण महाशिखर परिषदेचे प्रांत अध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर , जिल्हा अध्यक्ष विजय जोशी , ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पांडे , मराठवाडा सचिव सुनिल रामदासी , माहिला आघाडीच्या मराठवाडा संघटक तथा जिल्हा संपर्क प्रमूख सौ . स्वाती कुलकर्णी , ग्रामिणच्या जिल्हा अध्यक्षा प्रणिता जोशी , नांदेड उतरच्या जिल्हा अध्यक्षा प्रती वडवळकर , दक्षिण नांदेडच्या नलिनी जोशी , व अन्य पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत राज्यात व जिल्हयात ब्राम्हण महासंघाचे काम जोमाने चालू आहे . नांदेड जिल्ह्यात तालूका पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यत निखिल भाऊ लातूरकर यांच्या नेतृत्वाखाली ब्राम्हण महासंघाच्या वेगवेगळ्या आघाडीच्या नियुक्त्या करुन समाज एकीकरणाचे काम प्रगतीपथावर चालू आहे .
त्याचाच एक भाग म्हणून . जिल्हयातील ब्राम्हण समाजातील युवतीना संघटनेच्या मुळ प्रवाहात आनण्यासाठी निखिल लातूरकर यांनी युवतीची जिल्हा आघाडी स्थापन करुन जिल्हा कार्यकारनी जाहिर केली आहे . जिल्हा अध्यक्षपदी कु . संपदा राजेश कुलकर्णी सुजलेगांवकर यांची तर उपअध्यक्षपदी प्रणाली प्रशांत कळशे ,कार्य अध्यक्ष माधवी नंदकुमार मदनूरकर , चिटणीसपदी पूजा चद्रकांत शिराढोणकर, संघटक पदीशर्वरी विवेक लाठकर, सहसंघटक पदी अंकिता अनिल कमातिकर, सहसचिव पदी भाग्यश्री पाठक व कोषाध्यक्ष पदी अक्षदा क्षमंकर कुलकर्णी यांची निवड जाहिर केली आहे . जिल्हा अध्यक्ष संपदा कुलकर्णी यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार निखिल लातूरकर यांच्या संपर्क कार्यालयात , निखिल लातूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष विजय जोशी , स्वाती कुलकर्णी , प्रिती वडवळकर , प्रणिता जोशी , नलिनीताई जोशी ,यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्याचा सत्कार करून गौरविण्यात आले .व निखिल लातूरकर ., विजय जोशी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले .
सत्काराला उतर देताना कु . संपदा कुलकर्णी म्हणाली की युवक युवतीने एकत्र येवून समाजातील ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी एकजूट होवून कार्य केले पाहिजे . त्यासाठी आघाडी पुढाकार घेईल असेही कुलकर्णी हिने सांगितले ..
.
तसेच पूजा शिराढोनकर ही जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती झालेली आहे तिने तिचे मनोगत व्यक्त करताना बोलले की हे पद नसुन माझ्या साठी जबाबदरी आहे ब्राह्मण युवतींचे संघटन आणि त्यांच्या कल्याणासाठी मदतीची हात द्यायला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची युवती आघाडी नेहमी सक्रियपणे कार्यरत राहील
अंकिता कामतिकर हिने पणं तिचे मनोगत व्यक्त करताना बोलले की. आपण सगळे एकजूट राहिले होऊन काम केले तर आज नक्कीच पुढे जाऊ . भाग्यश्री पाठक, माधवी माडणुरकर, प्रणाली पाठक शर्वरी लाठकर ह्या. सर्व पदाधिकाऱ्यांनी पणं त्यांचे मनोगत व्यक्त केले
आणि ह्या निवडी बद्दल नायगाव, उमरी, धर्माबाद, देगलुर, हिमायतनर, भोकर,ज बिलोली ह्या तालुक्यातील ब्रम्हवृदांनी सोशल मीडिया द्वारे व प्रत्यक्ष सगळ्यांचे अभिनंदन केले
COMMENTS