नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
गेल्या २२ मार्च पासून देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य वायरसणे हाहाकार माजवला असल्याने नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन गेल्या सात महिन्यांपासून लॉक डाउन जारी केले असल्याने अनेक व्यावसायिक त्यातीलच टेंट हाऊस चे मालकासह त्यांच्या व्यावसायिकांवर अवलंबून असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने नायगांव टेंट हाऊस मंडप डेकोरेशन कॅग्या वतीने दिनांक २ /११/२०२० रोजी सकाळी विविध मागण्यांसाठी नायगांव तहसीलवर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
या धरणे आंदोलनास ख.वि.सं.चे चेअरमन
श्रीनिवास पा.चव्हाण यांनी सादर आंदोलनात सहभाग नोंदऊन त्यांनी मत व्यक्त करून आंदोलनास पाठिंबा दर्शविला दिला आहे.त्यासोबतच पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील शेळगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले,भारतीय जनता पक्षाचे नायगांव तालुका अध्यक्ष कोंडीबा पा.शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून सदर आंदोलनास भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे दर्शविले आहे.
- नायगांव टेंट हाऊस च्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या टेन्ट हाउस, मंगल कार्यालय,
- केटरसं, डेकारेटर्स, ऑनर्स वेलफेर अर असोशिएशन, नांदेड यांच्या वतीने राज्यस्तरी करण्यात येत असलेले
- आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही नायगांव तालुका टेन्ड हाऊस,मंडप डेकोरेशन, आचारी, वाढपी, फोटोग्राफर,
- संगीत ऑर्केस्ट्रा,सुत्र संचालक, गुरू-ब्राह्मण, बॅण्ड, सबळ, डि.जे., सिस्टम, इन्वहेंट मॅनेजमेंट, गादी-खुर्ची, हार-गुच्छ,
- (जनरेटर व लाईट, फ्लेक्स बांरड, रांगोळी, बाऊसर, फेटा मेकर्स स्वागत टिम, लाईट डेकोरेशन, मंडप, मंगल
- कार्यालय, लॉन्स आदी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
कोविड- १९- या महामारीच्या रोगामध्ये शासनाने अचारसंहिताचे अंमलबजावणी करून आमच्या व्यवसायावर व आमच्या कुंटूंबातील सदस्यावर संकटाचे सावट
उभे केलेले आहे. यामुळे मंडप डेकोरेशन सुरू करून ५०० लोकांसाठी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था तात्काळ करून द्यावी अशी मागामी करण्यात आली आहे.
टॅन्ट मंडप, मंगल कार्यालय, बंक्वेट हॉल, लॉन्स्, इव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड, लाईट डेकोरेशन आणि
इतर या व्यवसायाशी संबंधित जीएसटी 18टक्के ऐवजी 5टक्के पर्यंत करावी.
वन्याच या व्यवसायास धारकांनी साहितय ठेवण्यासाठी गोदाम, बँक्वेट हॉल, मंगल कार्यालय किरायाने
घेतले आहेत तेव्हा परिस्थिती सामान्य होईपर्यंत याचे भाडे घेऊ नये असे निर्देश कायद्यात समाविष्ट
करावे. कर्मचारी यांच्या पीएफ भूगतान मध्ये सवलत व स्थिती सामान्य होईपर्यंत शासनाने यांचे भूगतान करावे.
टॅन्ट, मंडपामध्ये होणाच्या विवाह समारंभाच्या वर लागणारा जोएसटी वधूपित्याला परत मिळण्याची
तरतुद करावी कारण हिंदू विवाह धर्मानुसार कन्यादान एक संस्कार आहे ते सामाजिक उत्सव नाही.
कर्ज धारकाचे व्याज माफ करावे व प्रत्येक ई.एम.आय.स्थिती सामान्य होईपर्यंत चालू करू नये.
नायगांव तालुक्यातील सर्व टेंन्ट मंडप व्यवसाय धारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा ज्यामुळे त्यांचा रोजगार व व्यवसाय
चालवण्यासाठी बँकेकडून कर्ज सहज प्राप्त होऊ शकेल.
टेन्ट, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट आणि या व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या
कर्जावर सबसिडीची
टेंन्ट, मंडप मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, लॉन्स्, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड, लाईट डेकोरेशन
आणि इतर संबंधित व्यवसायिक या कोरोना महामारीच्या कार्यात इसेन्शियल सर्विस मध्ये राहणे गरजेचे
आहे, कारण या सर्व सेवा या महामारी देशासाठी योगदान देत आहेत.
टेंन्ट, सत्कार समारोह संबंधित सुक्ष्म व अतिसूक्ष्म व्यावसायिक यांच्या खात्यात मदत राशी जमा करावी
व या व्यवसायाच्या अडचणी लक्षात घेऊन वेगळ्या मदत पॅकेजची घोषणा करावी.
राज्य सरकार यांचे काम करणारे टेन्ट, केटरिंग व्यवसायिक बिलांचे भूगतान लवकरात लवकर करावे
म्हणजे ते आपल्या आर्थिक अडचणी सोडवू शकतील.
टेंन्ट, मंडप, फर्निचर, लाईट, बँड, बग्गी, फुल मंडप, बॅक्वेट हॉल व या व्यवसायाशी संबंधितलावल्या
जाणार्या सर्व करात उदा. कमाशियल हाऊस टॅक्स, वॉटर टॅक्स, कचरा निवारण टॅक्स इत्यादी
निवेदनकर्ते प्रकाश यरसनवार,
इमामनसाब शेख, उस्मान चाऊस, शोर सोनमनकर,रामचंद्र करखेले,दिगांबर जुंबाडे सालेगावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ,हानमंत धुमाळे,बालाजी चौधरी,अब्दुल खरीद अ. करीमसाब,भगवान कोकूरले ,महेशभाऊ खंडगावकर छायाचित्रकार ,बालाजी हणमंते, माधव तेलमवार ,सत्तार चाऊस, शंकर तोडे,माधव मायवाड, देविदास मोटूरे,संजय वरघडे नावंदीकर, सत्यनारायण चिकोटकर पत्रकार माधव धडेकर, सदाशिव चौधरी, गोविंदराव तुपेकर, व्यंकट येरसनवार, मोईन शेखआदी उपस्थित होते.
COMMENTS