केज प्रतिनिधी:-
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद बीड पुर्व केज तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली.या वेळी भारतीय संविधान दिन प्रस्ताविका वाचुन साजरा करण्यात आला व 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस जवान यांना आदरांजली वाहुन बैठकीची सुरुवात जिजाऊ वंदन घेऊन करण्यात आली. तालुकाध्यक्ष विशाल देशमुख यांनी प्रस्ताविकात आढावा सादर केला व तालुकार्यध्यक्ष शेखर थोरात यांनी सभासद नोंदनी व षरिषदेच्या भविष्यात कार्यासंदर्भात आपले मत व्यक्त केली. जिल्हाकार्यध्यक्ष अविनाश काळे यांनी पदाधिकारी उपस्थितांना संघटनेच्या वाढीसाठी विद्यार्थी विद्यार्थीनी समस्या दूर होण्यास योग्य निर्णय अमलबजावणी करून शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी करता येईल अश्या अनेक विषयांवर आधारित मार्गदर्शन केले या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्या श्रृतीताई जाधव यांची विर भगतसिंह विद्यार्थी परिषद बीड पुर्व जिल्हाप्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष योगेश्वर आंबाड यांनी श्रृतीताई जाधव यांचे आई सह वडील जि प शिक्षक गजेंद्र जाधव यांचा सत्कार करून नियुक्तीपत्र व अहील्याई होळकर यांचे जीवनचरित्र भेट देऊन VBVP मध्ये स्वागत करत अभिनंदन केले.निवडीनंतर श्रृतीताईनीं निवड सार्थकी करण्यासाठी विद्यार्थीच्या न्यायिक सर्वांगीण प्रगती होण्यासाठी व हितजपण्यास आवश्यक वाणी लेखणी सदैव तत्पर असेल असा विश्वास व्यक्त केला.बैठकीत नियुक्ती केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तालुकाउपध्यक्ष ऋषी कांबळे यांनी उपस्थित सहकाऱ्यांचे आभार मानले. बैठक यशस्वीतेसाठी केज शहरध्यक्ष गजानन गायकवाड यांच्या नियोजनात करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS