मस्साजोग प्रतिनिधी*-
रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी दुपारी १ वा.केजच्या आ.नमिताताई मुंदडा व बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.तरी सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अतुल (दादा) मुंडे यांनी केले आहे.*
केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी नारेवाडी (धावज्याचीवाडी) येथे उभारलेल्या रेणुका अॅग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) गळीताचा २०२०-२०२१ च्या गळीताचा शुभारंभ रविवारी दुपारी १ वा.केजच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा व बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर शुभाशिर्वाद देण्यासाठी ह.भ.प.श्री.रतन महाराज सासुरेकर,ह.भ.प.श्री.भगवान महाराज वरपगावकर,ह.भ.प.श्री.नारायण महाराज पिंप्रीकर,ह.भ.प.माऊली महाराज बरडकर,ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प.केशव महाराज टाकळीकर उपस्थित राहणार आहेत.तर बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे,जेष्ठ नेते रमाकांत मुंडे,वीडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे,कळंबचे उद्योजक विष्णुसेठ सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न होणार आहे.तरी सदरील शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अतुल (दादा) मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS