गंगाखेड
सापाने चावा घेतल्याने मालेवाडी एका शेतकऱ्याचा बैल मृत्युमुखी पडला, या शेतकऱ्यास शासकीय मदतीची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांची उपस्थित उपायुक्त पशुधन अधिकारी गंगाखेड यांच्याकडे शनिवारी करण्यात आली.
गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी गजानन गंगाधर शिंदे यांचा बैल साप चावल्याने मृत्युमुखी पडला. सोयाबीन काढून ठेवलेली ढिगली जवळ बैलगाडी गेली असता त्यातून अचानक आलेल्या सापाने बैलाच्या पायात चावा घेतला. साक्षात शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत घटना घडल्याने लागलीच शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरला संपर्क केला. गंगाखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याने खाजगी बाजारातून इंजेक्शन उपलब्ध करावे लागले. यात बराच वेळ गेला.उपचार करूनही या बैलाचा मृत्यू झाला. तरी या शेतकऱ्यांना शासनाने नैसर्गिक आपत्ती विभागातून मदत करावी अशी मागणी धनगर साम्राज् सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे यांच्या उपस्थितीत शेतकरी गजानन गंगाधर शिंदे व मालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मुंजाभाऊ लांडे यांनी लेखी निवेदनाद्वारे शनिवारी केली*
सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्धतेसाठी आंदोलन करू सखाराम बोबडे पडेगावकर*
परभणी जिल्ह्यात एकाही शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध उपलब्ध नाही अतिशय खेदाची बाब आहे ते उपलब्ध करण्यासाठी लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करू अशी प्रतिक्रिया धनगर साम्राज्य सेनेचेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली. ते मालेवाडी तालुका गंगाखेड येथील शेतकऱ्याचा बैल साप चावून मृत्युमुखी पडल्यानंतर देण्यात येत असलेल्या निवेदन वेळी बोलत होते. शनिवारी गंगाखेड येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले .पुढे बोलताना ते म्हणाले की परभणी जिल्ह्यात गाय वर्गीय जनावरांची संख्या 299861 आहे तर महेश वर्गीय एवढी जनावरे 98495 आहेत .शेळ्या व मेंढ्या मिळून दोन लाख आहेत. अशी एकूण सहा लाख जनावरे असताना जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना या संकटास सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी आठ दिवसात जिल्ह्यात इंजेक्शन उपलब्ध न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला .यावेळी मुंजाभाऊ लांडे, गजानन शिंदे उपस्थित होते..

COMMENTS