महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत महिला बचत गटांना चोवीस लाखाचे कर्ज वाटप
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील कुंटूर ग्राम पंचायत अंतर्गत एकूण 12 महिला बचत गटांना महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत प्रत्येकी दोन लाख असे बारा गटांना 24 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून पुढील गटांना एकूण 60 गटांना एक कोटीच्या वर कर्ज वाटप होणार असल्याची माहिती बँक मॅनेजर श्री करण सिंग यांनी दिली आहे. महिला बचत गटाला गेल्या वर्षी एकूण बारा गटांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे वाटप करण्यात आले होते या वर्षी प्रत्येक 12 गटांना प्रत्येकी 1 लाख 90 हजार प्रमाणे 24 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील सर्व महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव व महिला उपस्थित होत्या .यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी श्री करण सिंग तसेच कॅशियर श्री कदम सर, सेवक श्री बालाजी सावकार कुंटूर येथील (सीआरपी) समुह संसाधन व्यक्ती रेखाताई कांबळे, व रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाचे अध्यक्ष रेखा कांबळे व कोमल गजभारे त्याचबरोबर 12 महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. यावेळी समता महिला बचत गट कुंटूर ,संत कबीर महिला बचत गट , संजीवनी महिला बचत गट कुंटूर ,भिमाई महिला बचत गट ,पंचशील महिला बचत गट , जय अंबिका महिला बचत गट कुंटूर ,सैलानी बचत गट कुंटूर, संजीवनी महिला बचत गट कुंटूर, छत्रपती महिला बचत गट कुंटूर, जिजाऊ महिला बचत गट कुंटूर,असे एकूण बारा महिला बचत गटांना प्रत्येक दोन लाखाचा प्रमाणे 24 लाख रुपयाचे बँक मॅनेजर यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्यामुळे महिला बचत गटाच्या सर्व अध्यक्ष सचिव यांनी बँकेचे आभार मानले आहे.

COMMENTS