नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नायगांव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे 26 11 आतंकवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण दिवशी पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक कार्य व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे सहाय्यक निरीक्षक करीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे . दिनांक 26/11/2020 रोजी सकाळी 10 वाजता कुंटुर पोलीस ठाण्यात सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मुंबईत झालेल्या 26/11 आंतकवादि हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण म्हणून कुंटुर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध सामाजिक कार्य करण्याचे काम सध्या सुरू असून कुंटूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण म्हणून महारक्तदान शिबिराचे आयोजन करून सर्वांनी रक्तदान करावे व आपल्या बंधू भावांना अपघातांमध्ये झालेल्या दुखापत अश्या अनेक प्रकारच्या रुग्णांना रक्त कमी पङु नये त्यांना रक्त दिल्यानंतर त्यांना एक महादान जीवदान मिळते यामुळे एक सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्य म्हणून आपण यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कुंटुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खाँनपठाण व उपनिरीक्षक दिनेश येवले यांनी केले असून सर्व कर्मचारी व सर्व स्टाॅफ यामध्ये सहभागी होऊन आयोजित करणार आहेत.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन कुंटुर पोलिस ठाण्यात वतीने करण्यात आले आहे.


COMMENTS