(ज*प्रतिनिधी*
सार्वजनिक बांधकाम विभागाने नको त्या ठिकाणी आवासत्व गतिरोधक तयार केले आहेत. मात्र ज्या ठिकाणी त्याची गरज आहे. त्या ठिकाणी ते गतिरोधक बनवत नाहीत.
केज तालुक्यातील पिंपरी व बोरगाव चौफळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी व वाहनचालकांची मागणी असुनही वरील ठिकाणी सा.बां.विभागाने गतिरोधक बनवले नाहीत.
पिंपरी बोरगाव (बु) चौफळा या ठिकाणाहून उस्मानाबाद ,बीड, लातूर, आंबेजोगाई, मसाजोग ,बीड मुंबई अशा ठिकाणी जाण्याचे रस्ते आहेत परंतु हा चौरस्ता एकदम पूर्णपणे खुला असून त्यावर अद्याप पर्यंत एकही गतिरोधक बसवलेले नाही. त्यामुळे या ठिकाणाहून ये जा करणारे वाहने ही भरधाव वेगाने जात असल्याने याठिकाणी दर आठ दिवसाला एक दोन अपघात होत आहेत.
यामुळे अपघाताची मालिका ही सुरूच आहे. या गोष्टीकडे सां बा विभाग का लक्ष देत नाही. ज्या ठिकाणी गतिरोधक ची आवश्यकता नाही त्या ठिकाणी कामापेक्षा जास्त गतिरोधक बनवले आहेत. परंतु ज्या ठिकाणी गतिरोधक ची आवश्यकता आहे तिथे एकही गतिरोधक नसल्याने वरील ठिकाणी अपघात घडत आहेत.या ठिकाणी अनेक अपघात होऊन काही व्यक्ती दगावल्या देखील आहेत कोरोना काळात या ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले होते. फक्त त्याच वेळी वाहने सावकाश चालत होती मात्र आता वाहनांची वर्दळ वाढल्याने याठिकाणी चारही दिशानी येणारे आणि जाणारी वाहने भरधाव वेगात येत आणि जात आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत त्यामुळे सां बा विभागाने तात्काळ सावध भूमिका घेऊन येत्या आठ दिवसात पिंपरी व
बोरगाव (बुद्रुक) या चौरस्त्यावर चारही बाजूने मोठे गतिरोधक बनवावेत जेणेकरून वाहनाचा वेग मंदावेल व अपघातांना आळा बसेल त्यामुळे तात्काळ गतिरोधक बनवण्याची मागणी सर्वसामान्य जनता प्रवासी वर्ग व वाहन चालक करत आहेत.
सोबत फोटो....

COMMENTS