हार तुरे सत्कारा पेक्षा मास्कचे वाटप करावे आ. सुरेश धस आष्टी( प्रतिनिधी) आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांचे अतोनात नुसकान होऊनही अद...
हार तुरे सत्कारा पेक्षा मास्कचे वाटप करावे आ. सुरेश धस
आष्टी( प्रतिनिधी) आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांचे अतोनात नुसकान होऊनही अद्याप पंचनामे सुद्धा झाले नाहीत. तीन-तीन वेळा कांदा बियाणे उगवले नाही अशी परिस्थिती असून सुद्धा नुसकान ग्रस्त पिकांचे पंचनामे ज्यावेळी पिकांची नुसकान झाले होते त्यावेळेसच होणे गरजेचे असताना आज पिकाचे पंचनामे करण्यात यावे म्हणजेच विद्यमान लोकप्रतिनिधींचे आव्हान म्हणजे बैल गेला आणि झोपा केला या प्रमाणेच असून या मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची पूर्णता चाळणी झाली आहे लोकप्रतिनिधी कुठे आहेत ?असे आमदार सुरेश धस यांनी साबलखेड शरद देसाई यांच्या अंबेश्वर ट्रेडर्स उद्घाटन प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य सरकारवर चौफेर आपल्या शैलीत फटकेबाजी करीत ताशेरे ओढले .
कडा धानोरा रोडवर असलेल्या साबलखेड येथे सरपंच शरद देसाई यांच्या अंबे श्वर ट्रेडर्स ,बिल्डींग मेटरियल्स ,शेती अवजारे या दालनाच्या उद्घाटन सोहळा आ. सुरेश धस यांच्या हस्ते सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांची प्रमुख उपस्थिती होती .या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सुरेश धस यांनी आंबे श्वर ट्रेडर्स या दालनाला शुभेच्छा देत या व्यवसायाच्या माध्यमातून शरद देसाई यांनी ग्रामीण भागात मोठे दालन उभा केले असून ग्राहकांचे हित साधावे असे सांगत अशा प्रसंगी मान्यवरांचे हार फेटे तुरे देऊन सत्कार न करता कार्यक्रम आयोजकांनी मास्क चे वाटप करावे असाही सल्ला आमदार धस यांनी यावेळी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले आज राज्यातील सरकार अकार्यक्षम असून जिल्ह्याचे पालकमंत्री ते मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांचे शासकीय कर्मचारी कोणी ऐकत नसल्याचे दिसत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकाची नुसकान झाले होते त्यावेळी पंचनामे करण्याची गरजेचे असताना कुठल्याही कृषी कार्यालय मार्फत कोणत्याही अधिकाऱ्यांनी आजपर्यंत पंचनामे का केले नाहीत .बीड जिल्ह्याला दीडशे कोटी रुपये अनुदाना साठी आलेत मग आष्टी पाटोदा तालुक्यासाठी एकही रुपया का मिळाला नाही असे सांगत आज पंचनामे करा ही मागणी म्हणजे बैल गेला आणि झोपा केला या म्हणीप्रमाणे असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत द्यावी अशीही मागणी धस यांनी यावेळी केली. यावेळी सभापती बद्रीनाथ जगताप ,चेअरमन संजय गाढवे ,आत्माराम फुंदे, सरपंच अनिल ढोबळे ,राजेंद्र दहातोंडे ,रमजान तांबोळी ,मार्केट सभापती दत्ताभाऊ जेवे ,पससदस्य परमेश्वर काका शेळके ,आबासाहेब कर्डिले, अशोक इथापे ,अंकुश चव्हाण ,राम हरी महानोर, बाळासाहेब थोरवे ,अजित घुले ,सुभाष तळेकर ,राम धुमाळ, शिरीष थोरवे , शत्रुघन मरकड ,कृष्णा काकडे ,भरत घोडके, विजय शेळके ,नवनाथ जाधव ,डॉक्टर भरत जाधव,महेश खाकाळ, सागर ढोबळे ,दिलीप ससाने, हिरालाल बल्डोटा ,अन्सार शेख सरपंच साबळे ,गाडे काका,गोपाळ भाऊ रक्ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार व स्वागत रंगनाथ घोडके, शरद देसाई ,रोहित देसाई ,सागर आमले ,दादासाहेब करडुले यांनी केले.


COMMENTS