नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
वैद्यकीय शास्त्रास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अॅड.सुधांशू चौधरी यांच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.. तसेच ह्याच संदर्भात अजूनही काही याचिका दाखल झाल्या होत्या..दोन्ही याचिकेवर आज सुनावणी झाली असून मा.सर्वोच्च न्यायालया यांच्या आदेशानुसार, ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे त्या विद्यार्थ्यांना CET CELL ह्यांनी प्रवेशा वेळी तात्पुरत्या स्वरूपासाठी वैधता प्रमाणपत्राची मागणी करू नये...
व समितीने अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दिनांक ०१/१२/२०२० पर्यंत निकाली काढावे तसेच अवैध झालेल्या प्रकरणात वैधतेसाठी माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय यांनी लवकरात लवकर निकाली काढाव्या.. व विद्यार्थ्यांनी आपले वैधता प्रमाणपत्र दि. १०/१२/२०२० पर्यंत सदरील महाविद्यालयात वैधता सादर करून आपला प्रवेश कायम करावा सदरील प्रकरणात वेळेत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी अॅड चंद्रकांत थोरात, अॅड ओम तोटावाड ह्यांनी सर्व तो पूर्ण प्रयत्न करून अॅड सुधांशु चौधरी (वकील,सुप्रीम कोर्ट) ह्यांना सहकार्य केले.

COMMENTS