महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याचे हद्दीत हिंगोली नांदेड महामार्गावर जिंतुर टि पाईंटवर रस्त्याच्या दोन्ही बाजुने झाडे झुडपे वाढली होती ज्यामुळे वळण रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. ज्याची दखल घेऊन हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरून रसत्याच्या दोन्ही बाजुंची झाडे झुडपे साप करून वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. अपघात टाळण्यासाठी स्वतः कर्तबगार अधिकारी गजानन मोरे यांनी रस्त्यावर उतरल्याने अनेकांना जिवदान मिळणार आहे यावेळी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर,सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या आदेशानुसार हट्टा पोलिस ठाण्याचे कर्तबगार ठाणेदार गजानन मोरे, पोलिस कर्मचारी ठाकूर ,कदम यांनी स्वतः मजूर आणि jcb चे साह्याने सदरचे वाळणावरील वाढलेले झाडे झुडवे तोडून रस्ता स्वच्छ केला आहे.

COMMENTS