नांदेड
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. सतीश चव्हाण ह्यांनी शंकर कनिष्ठ महाविद्यालयास भेट देऊन मोठ्या सांख्येने उपस्थित असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांशी मागील काळात सोडवले विविध प्रश्न तसेच उर्वरित प्रश्न देखील सोडविण्याचे आश्वासन दिले.
सभेच्या अध्यक्षस्थानी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.जगदीश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.उपमहापौर आनंदराव चव्हाण व मा. श्रीकांत काळे हे होते. व्यासपीठावर प्रा.नारायण शिंदे, प्रा.जांभरूनकर, प्रा. मझरोद्दीन,श्री शिवाजीराव देशमुख, श्री.आर.डी.कांबळे, सौ. कल्पना डोंगळीकर, सौ.अनुराधा पाटील, सौ.रावणगावकर हे उपस्थित होते तसेच श्री पांपटवार, प्रा.श्री.निलेश राठोड, प्रा.राम जाधव, प्रा.श्रीधर जाधव, अॅड.श्री बचाटे, श्री.वानखेडे, श्री.डी.एम.जाधव, श्री मुंडे, श्री वडजे, श्री.गजले, श्री.आनंद मोरे, श्री मोरे सर राहाटी, श्री.भास्कर कळकेकर ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. गोविंदराव मेथे यांनी केले, सुत्र संचलन श्री.उद्धव ढगे ह्यांनी केले तर आभार श्री जयवंत शिंदे ह्यांनी मानले.
संयोजक म्हणून संस्थेचे सचिव श्री.तिरुपती मेथे,प्राचार्य श्री कोपरे,प्रा.श्री धात्रक,प्रा.श्री वाघमारे,श्री संतोष बस्वदे आणि श्री विलास पाटील ह्यांनी उपस्थितांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले.

COMMENTS