जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी हिंगोली
आपल्या उत्कृष्ट कामगिरी ने नेहमीच चर्चेत असणारे हट्टा पोलिस ठाण्याचे दबंग ठाणेदार सपोनी गजानन मोरे यांनी नेहमीच पिडितांना न्यायदेण्याचे काम केले आहे. शनिवारी गुंडा या गावातील युवक बेपत्ता झाल्याची तक्रार हट्टा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. ज्याचा उत्कृष्ट सायबर तंत्रज्ञानाच्या मार्फत तपास करीत आवघ्या काही तासात बेपत्ता युवकाचा खुन झाल्याचे निष्पन्न करून खुनाला वाचा फोडत तीन आरोपींना अटक करून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. तर यामध्ये त्यांना स्थानिक गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे...
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंडा या गावातील 21 वर्षीय युवक ज्ञानेश्वर शिवाजी चव्हाण हा बेपत्ता झाल्याची मीसींग दोन दिवसा पुर्वी हट्टा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.त्यानंतर सदर युवकाची मोटार सायकल जिंतुर रोडवरील हिवरखेडा येथील नाल्यात अढळून आली होती. तर युवकाचा मोबाईल पुर्णा परिसरातील एका महिलेला सापडला होता. युवकाची मोटरसायकल व मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला असे म्हणतात ना कि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी गुन्हा करीत असतांना काही तरी सबुत मागे सोडतोच आणि तपास अधिकारी सपोनी गजानन मोरे यांच्या सारखा असल्यावर तर गुन्हेगार कसा सुटेल याचा परिचय या घटनेत आला आणि तपासाला गती मिळाली दोन युवा अधिकारी सपोनी गजानन मोरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी सायबर तंत्रज्ञानाचा आधार घेत सोमवारी युवकाच खुन झाल्याचे निष्पन्न करीत युवकाचा म्रुतदेह जवळा बाजार परिसरातील तुरीच्या शेतातुन शोधुन काढला यावेळी ज्ञानेश्वर चव्हाण याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून खुन केल्याची कबुली आरोपी प्रमोद अप्पासाहेब खाडे रा.हट्टा याने कबुली दिली. ज्यामधे मयत यूवक हा आरोपीच्या प्रियसीला फोनवर बोलत असल्याचे रागातुन त्याचा मित्रांच्या मदतीने काटा काढला असे सांगितले यानंतर पोलिसांनी अन्य दोन आरोपी विनोद भिमराव कापुरे रा.हट्टा व प्रविण लक्ष्मण अंभोरे रा. परभणी यांना अटक केली. सदर तपास पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक आयपिएस यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा व स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे.

COMMENTS