केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील केवड येथे आज दि. 22/11/ 2020 रोजी सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिर व तुळजाभवानी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. ...
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील केवड येथे आज दि. 22/11/ 2020 रोजी सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिर व तुळजाभवानी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील केवड येथे रविवारी सकाळी नऊ वाजता ह.भ.प. शांतीसागर श्रीधर नाना उत्तरेश्वर पिंप्रीरीकर व ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री, मठाधिपती मठ संस्थान वरपगाव यांच्या शुभहस्ते व भाजपाचे शिवराम घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हनुमान मंदिर व तुळजाभवानी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अशोक कोल्हे, गणेश सपाटे, अनिल सपाटे, भागवत सपाटे, शहाजी सपाटे, विजय सपाटे, महादेव सपाटे, दिनकर सपाटे, रामदास सपाटे, काकासाहेब कोल्हे, भगत कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे रामराजे गलांडे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

COMMENTS