केज ,(प्रतिनिधी)
काल २१नोहेंबर रोजी जागतिक टेलेव्हीजन दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्था यवतमाळ आणि एसबीआय फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेली तीन वर्षापासून धारूर तालुक्यातील मौजे हिंगणी, चिखली, देव दहिफळ, गावंदारा आणि तांदळवाडी या गावात विविध उपक्रमाच्या माध्यमातून एसबीआय ग्राम सेवा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून आज च्या दिनाचे महत्व आणि लोकामध्ये जनजागृती करण्यासाठी साठी मौजे हिंगणी (बू )तसेच इतर सर्व गावात जागतिक टेलेव्हीजन दिन साजरा करण्यात आला यामध्ये प्रकल्प अधिकारी वली तांबोळी यांनी गावातील सहभागी तरुण, शेतकरी, गावकरी इत्यादींना माहिती केंद्रातील स्मार्ट टीव्ही वर विविध कार्यक्रम दाखविले तसेच वली तांबोळी व एकनाथ शिंदे यांनी गावकर्यांना टीव्ही चे सद्याच्या युगात आपल्या जीवनात किती महत्व आहे तसेच टीव्हीमुळे समाजातील सर्व वर्ग मग तो युवा असो किंवा वृद्ध, लहान असो किंवा महिला कशा प्रभावित झाल्या आहेत.तसेच टीव्ही चा इतिहास भारतात कसा सुरू झाला, लोकांना महत्वाच्या बाबी सुलभ आणि सोप्या परीने टीव्ही मुळे कशा मिळत आहेत आणि टीव्ही ने आता आपल्या जीवनात एक स्थान कसे संपादित केले या विषयी लोकांशी संवाद साधुन टीव्ही चा वापर याचे फायदे व तोटे तसेच टीव्ही चे आधुनिक काळातील प्रकार विषयी माहिती देण्यात आली तसेच जुन्या काळापासून आज पर्यंत टीव्ही चा विविध क्षेत्रात वापर आणि प्रयोग विषयी देखील माहिती चे देवाणघेवाण करण्यात आले तसेच या प्रकल्पा अंतर्गत माहिती केंद्र तसेच प्रत्येक गावातील जि प शाळेत स्मार्ट टीव्ही देण्यात आली असून या टीव्ही चा वापर आप आपले जीवन मान सुकर आणि स्मृद्ध करण्यासाठी करू तसेच शैक्षणिक, शेती विषयी व गाव विकास विषयी माहिती या उपकरणाच्या माध्यमातून जास्तीतजास्त घेऊन लोकांमध्ये याचा प्रसार करणे विषयी आजच्या दिनी एक संकल्प घेण्यात आला.

COMMENTS