केज तालुक्यातील वीजप्रश्‍नाचा 7 वर्षापासून रखडलेला प्रश्‍न लागला मार्गी;

नविन 33 के.व्ही.कानडी वाहिनी केली चालू; येथून पुढे सातत्याने वीज सुरळीत चालू. केज ः (प्रतिनिधी) केज तालुक्सयामध्ये 132 के.व्ही. उपकेंद्र असु...


नविन 33 के.व्ही.कानडी वाहिनी केली चालू; येथून पुढे सातत्याने वीज सुरळीत चालू.

केज ः (प्रतिनिधी) केज तालुक्सयामध्ये 132 के.व्ही. उपकेंद्र असुन तेथुन महावितरणच्या 33 के.व्ही.उपकेंद्रांना विद्युत पुरवठा होतो. 132 के.व्ही.उपकेंद्र येथुन 33 के.व्ही.विडा व होळ या 33 के.व्ही.च्या वहिनी निघतात. 33 के.व्ही.विडा या वाहिनीवर एकूण 33 के.व्ही.कानडी माळी, उमरी, येवता, देवगाव, विडा, राजेगाव, ह.पिंप्री सात उपकेंद्र आहेत. त्यामुळे कुठेही वाहिनी नादुरुस्त झाली तर संपूर्ण भाग अंधारात राहत होता व ग्राहकांना चांगल्यादाबाने विद्युत पुरवठा मिळत नव्हता. तसेच 33 के.व्ही. होळ वाहिनीवर कुंबेफळ, होळ, जवळबन, कानडीमाळी, डोंगर पिंपळपा ता.अंबाजोगाई हे पाच उपकेंद्र आहेत येथेही अडचण होती.

वरील दोन्ही 132 के.व्ही. वाहिनीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न महावितरण कंपनीकडून करण्यात येणार होता. परंतू 132 के.व्ही. उपकेंद्र केजच्या आजूबाजूचे शेतकरी पोल उभा करण्यास विरोध करत होते. त्यामुळे सदरील काम गेल्या सहा ते सात वर्षापासून रखडले होते.

महावितरणकडून गेल्या आठवड्यात उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर यांनी अनेक शेतकर्‍यांच्या भेटी घेवून सदरील समस्येबाबत समजावून सांगीतले. त्यानंतर त्यांनी एक पोल उभा करुन दिल्यामुळे 132 के.व्ही. उपकेंद्रातून 33 के.व्ही. कानडी ही नविन वाहिनी तयार करण्यात आली. व त्यावर 33 के.व्ही. कानडीमाळी, उमरी व येवता ही तीन उपकेंद्र घेण्यात आली. त्यामुळे 33 के.व्ही. विडा व होळ यावरील भार कमी झाला आहे. सदरील नविन वाहिनीमुळे महावितरणच्या ग्राहकांना चांगल्याप्रकारे वीज पुरवठा होणार आहे.

सदरील सहा ते सात वर्षापासून रखडलेले काम हे मा.अधिक्षक अभियंता कोलप, तसेच कार्यकारी अभियंता संदिप चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर व सर्व कर्मचारी यांनी गेल्या 15 दिवसांच्या अथक परिश्रमातून पूर्ण केले. या नविन वाहिनीसाठी सहकार्य केलेल्या शेतकर्‍यांचे महावितरणच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सदरील नविन वाहिनीचे काम शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामाच्या एैनवेळी झाल्यामुळे याचा निश्‍चितच फायदा शेतकर्‍यांना होईल.

* शेतकर्‍यांची समजूत काढत रखडलेला वीजप्रश्‍न अखेर निकाली काढला....

मागील सात वर्षापासून केज तालुक्यात सतत खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेवून अधिक्षक अभियंता श्री.कोलप, कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांच्या आदेशान्वये केज उपविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी एैन दिवाळीचा उत्सव टाळत 15 दिवस अथक परिश्रम घेवून नविन कानडी वीजवाहिनीचे काम पुर्ण केले. यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकर्‍यांना चांगल्या दाबाने वीज पुरवठा होणार आहे.- राजेश अंबेकर, उपकार्यकारी अभियंता, केज.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group