शेळगाव छत्री घरकुल लाभार्थ्यांचे रेतीसाठी आमरण उपोषण
.
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या जीआर प्रमाणे घरकुल बांधकाम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी नायगांव तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही रेती न मिळाल्यामुळे अखेर लोकशाही मार्गाने रेती मिळण्यासाठी अमरण उपोषण करीत आहेत.
शेळगाव छत्री येथील घरकुल लाभार्थ्यांनी रेती उपलब्धतेसाठी दिनांक 28 सप्टेंबर, 13 ऑक्टोंबर, व 23 नोव्हेंबर रोजी निवेदन देऊनही संबंधित तहसीलदार यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने अखेर घरकुल लाभार्थी राजेंद्र वाघमारे, जळबा वाघमारे, शिवलिंग बैलकवाड, मरीबा धसाडे, शांताबाई दाडेराव, श्रीमती उज्वला बैलकवाड, केराबाई बैलकवाड, यादव वाघमारे यांनी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करीत असून याबाबत कॉम्रेड देवराव आईलवार, गंगाधर कोतेवार, संदीप वाघमारे, प्रभाकर घंटेवाड या कार्यकर्त्यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेऊन सदर उपोषणकर्ताच्या मागणी संदर्भात विचारणा केली असता आपण आजच रेती मिळण्याचे पत्र निकाली काढू असे तहसीलदार तोंडी आश्वासन दिले आहे.

COMMENTS