अर्धापूर प्रतिनिधी |
राज्य शासनाने कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला स्थगिती देऊन प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले.आता ही स्थगिती उठवण्यात आली आहे.जुलै ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या ४६ ग्रामपंचायती पैकी २३ महिला राखीव असे सरपंच पदाचे आरक्षण आज गुरूवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयातील आवारात जाहीर होणार असून कोरोनाची सर्व खबरदारी घेत सोशल डिशटंन्स,मास्क,सॅनिटाइजर,चोख पोलीस बंदोबस्तात सोडत होणार असून सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाल्या बरोबर ग्राम पंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे.
अर्धापूर तालुक्यातील ३९ नवाने हदगाव तालुक्यातील समाविष्ट झालेल्या ७ ग्रामपंचायतींची ४६ ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत ता.१९ गुरूवारी रोजी होणार असून. ४६ पैकी २३ महिला राखीव तर ८ एसी,२एस.टी,१२ ओबीसी,२४ ओपन असे सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.
ग्राम पंचायत निवडणुक तयारींना वेग आला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना वार्ड निहाय आरक्षण या पुर्वीच जाहीर करण्यात आला आहे.अर्धापूर तालुक्यात एकूण ४६ ग्रामपंचायती आहेत त्यातील एप्रिल ते डिसेंबर जुन्या ३९ व हदगाव तालुक्यातील नवाने अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झालेल्या ७ अशा एकूण ४६ ग्रामपंचायतीची मार्च ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणार आहे.अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
जिल्ह्यासह देशभरामध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढत होता यामुळे दि.१८ मार्च २०२० रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शासन निर्णयानुसार स्थगित करण्यात आला होता. करोनाचे रुग्ण कमी झाल्याने आता अर्धापूर तालुक्यातील ३९ तर हदगाव तालुक्यातील नवाने समाविष्ट झालेल्या ७ अशा एकूण ४६ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे २०२० व २०२५ चे आरक्षण सोडत ता.१९ गुरूवारी रोजी तहसील कार्यालयातील आवारात चिट्ठी काढून आरक्षण जाहीर होणार असलेल्याची माहिती तहसीलदार सुजित नरहरे, नायबतहसीलदार दामोदर जाधव,मारोतराव जगतात,मंडळ अधिकारी शेख शेफियोद्दीन,संजय खिल्लारे,प्रफुल्ल खंडागळे,तलाठी रमेश गिरी यांच्या सह पंचायत समिती आरोग्य पथक,महसुलचे अनेक कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
आरक्षण जाहीर होताच ग्राम पंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू होण्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण गुरूवारी रोजी सुटणार याकडे परिसरातील नागरिक व स्थानीक गाव पुढार्यांचे लक्ष लागले आहे या आरक्षणावर पुढील ग्राम पंचायत निवडणूकीसाठी तरूणांनी कोरोना मध्ये जनसेवा करून जनतेला बरीच मदत केली होती त्यामुळे आगामी काळातील ग्राम पंचायत निवडणूक चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे

COMMENTS