आतकुर रोड वर मुरुम टाकुन रस्ता दुरुस्त करा- मनसे
धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्यातील आतकुर येथील रोड हे ग्रामीण भागात येत असुन ते जिल्हा परीषदे अंतर्गत मंजुरी मिळाली असुन ते रोड करण्याची दिशा चुकली असे सांगुन गुतेदारा मार्फत हे रोड मागील दोन ते तिन महीन्यापासुन उकरुन ठेवुन अध्याप ते काम करुन न दिल्यामुळे लोकांना त्या रोडवर ये- जा करणे अत्यंत कठीण होत असुन त्या रोडवर वाहने चालवणे म्हणजेच तारेवरची कसरत केल्या सारखे झाले आहे. अश्या परीस्थितीत बांधकाम विभागाने तत्काळ त्या रोडवर गुतेदारांना मुरुम टाकण्याचे सूचना देवुन ते रोड सुरळीत करुन द्यावे. असे निवेदन उपअभीयंता बिलोली व तहसीलदार धर्माबाद यांना देवुन मनसे च्या वतीन सांगण्यात आले आहे. असे आमच्या प्रतीनीधीशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी सांगीतले आहे.

COMMENTS