वारकरी प्रबोधन सेवा मंडळ केज तालुका अध्यक्षपदी रवीकुमार गायकवाड यांची निवड
चिंचोली माळी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार
====================================
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवाशी रवीकुमार गायकवाड यांची वारकरी प्रबोधन सेवा मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री. रवीकुमार गायकवाड यांच्या सांप्रदायिक कामाची व कलेची दखल घेऊन वारकरी प्रबोधन सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश महाराज वाघ व सचिव संगीतरत्न आदिनाथजी सटले गुरूजी, व लातूर जिल्हाध्यक्ष बंडोपंत महाराज ढाकणे, बीड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज लांब, यांनी केज तालुका अध्यक्ष पदी रविकुमार गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
यानियुक्तीच्या पार्श्वभूमीवर चिंचोली माळी येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर मध्ये सरपंच श्री. सुनील बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री रवी कुमार गायकवाड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री संजय महाराज नखाते, अशोक बर्डे, अनुरथ गायकवाड, व सेंटरचे संचालक अनिल गलांडे, संभाजी महाराज कदम, जालिंदर गलांडे, पंढरी काळे, आश्रुबा सारुक, अमीन शेख, अविनाश महाराज नखाते, महादेव गलांडे, मनोज गलांडे, वैजनाथ काळे, रामराजे गलांडे, प्रमोद नखाते, मनोज काटे, दत्ता राऊत यांच्यासह नागरिक व तरुण उपस्थित होते.

COMMENTS