प्रतिनिधी/माजलगांव
माजलगांव तालुक्यातील तालखेड येथील ग्रामपंचायतने एकुण सदस्य १३ व ०१ सरपंच या पैकी ११ सदस्यांनी उपसरपंच यांच्या विरोध्द दिनांक ३/११/२० २० रोजी अविश्वास ठरावाची नोटीस दिलेली आहे त्या अनुषंगाने अविश्वास ठरावाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत मोजे तालखेडच्या सर्व सदस्यांनी विशेष सभा मा. तहसीलदार माजलगांव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९/११/२०२० रोजी ठिक २ वाजता ग्रामपंचायत कार्यालय मोजे तालखेड येथे ओयोजित करण्यात आलेली आहे. मोजे तालखेड येथील उपसरपंच हे इतर सदस्यांना गैर वागणूक देत आहेत, सदस्यांना विश्वासात न घेता स्वात:मनमानीपणे निर्णय घेतात, उपसरपंच ह्या पतिला ग्रामपंचायत अधिकार कार्यक्षेत्राबाहेरील कामाचे निवेदन देऊन ग्रामपंचायतीला वेठीस धरतात, सर्व सदस्यासी समन्वय नसल्याने उपसरपंचावर कुठलाही विश्वास राहीलेला नाही.
यासोबतच अविश्वासाच्या ठरावाची नोटीस मा. तहसीलदार याना सरपंच यांच्या सही ११ सदस्यांनी नोटीस/ निवेदनाद्वारे देण्यात आली . यावेळी सर्व सदस्य व सरपंच मोजे तालखेड. येथे हजर राहावे असे बजावलेल्या नोटिसात म्हंटले आहे
COMMENTS