मातोरी, पारगांव मिडसांगवीत बिबट्याच्या भिंतीने सर्वसामान्यात दहशत !
भिंतीपोटी शेतीचे कामे खोळंबली
-------------------------------------- ------
मादळमोही दि, ३ (संतोष भारती):- शिरुर कासार तालुक्यातील मातोरी,घोगसपारगांव परिसरात बिबट्याच्या दहशतीने गांवातील लोक घाबरत आहेत, शेतकरी वर्ग शेतातील कामे करण्यासाठी शेतात जात नाही,त्यामुळे शेती व्यवसायाला मोठी खिळ बसली आहे, अत्यंत महत्वाचे समजले जाणारे कापुस पिक वेचणी वेग आला आसतानाच परिसरात बिबट्याच्या संचाराने खळबळ उडाली आहे, वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी परिसरात फिरकले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे नसता तिव्र आदोंलन केले जाईल अशा सुर निघत आहे,
पाथर्डी तालुक्यातील काही गांवात बिबट्याने लेकरांना मारल्याची माहीती समोर येत आसतांनाच तालुक्यातील बँर्डर लगत गांवातील मिडसांगवी, घोगसपारगांव, मातोरीच्या माळराणात बिबट्याचा संचार अनेकाने डोळ्याने पाहील्याचे बोललेले जात आहे, त्यामुळे परीसरातील लोक दहशतीत आहेत, या परिसरातील जनतेला संपर्क केला आसताता वनविभागाला कळवुनही इकडे कोणी फिरकलेच नाही अशा सुर निघत आहे,सध्या खरीप हंगामातील महत्वाचे पिक पांढरे सोने कापुस वेचण्याची लगबग सुरु आसतानाच या परिसरात बिबट्या आल्याच्या भिती पोटी कोणीच शेतात जात नसल्याने शेतीच्या सर्वच कामाना ब्रेक लागला आहे, गुरे चारणारे गुरे घेवुन शेतात जात नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे,त्यामुळे संपुर्ण परिसरात भितीचे वातावरण आसुन तात्काळ योग्य त्या उपाय योजना वनविभागाने कराव्यात अशी मागणी होत आहे,
COMMENTS