*रमेश इतापे:-* केज तालुक्यातील पाथरा येथे आधार फाउंडेशन ग्रुप कडुन मागील तीन वर्षांपासून गोरगरीब निराधार गरजवंतांना किराणा साहित्याचे वाटप केले जाते त्याच अनुषंगाने याही वर्षी किराणा सामान वाटप करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की मागील तीन वर्षांपासून राहुल खोडसे, मनोरम पवार यांच्या संकल्पनेतून निराधार व गोरगरीब लोकांना निवडुन ज्यांची की दिवाळी गोड होणार नाही असे लाभार्थी निवडून हा कार्यक्रम आयोजित केला जातो सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुने व आधार फाउंडेशन ग्रुप मधिल संभाजी ब्रिगेडचे ता.अध्यक्ष राहुल खोडसे,पाथरा येथील ग्रांमसेवक पांडुरंग राउत,पत्रकार मनोराम पवार,पत्रकार दत्ता मुजमुले,हमीद शेख यांची उपस्थितीती होती तर हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यातुन पार पडला जातो यामध्ये काटे ट्रांन्सपोर्ट पुणे,राहुल खोडसे, दत्ता मुजमुले यांनी हि अर्थिक मदत केली सर्वांच्या सहकार्यातुन व मदततीतुन दिवाळीनिमित्त किराणा साहित्य वाटप करन्यात आले गत तीन वर्षापासून आधार फाउंडेशन कडून गरीब निराधारांना किरणा साहित्याचे वाटप करण्यात येते
याकार्यक्रमाला आसाराम पवार व गावातील प्रतीष्ठीत नागरीक महिला उपस्थित होत्या .
या या कार्यक्रमात राहुल खोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार मनोराम पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले हा कार्यक्रम राबवत असताना विविध अडचणींचा सामना करत त्यांनी हा उपक्रम राबवला हाच उपक्रम प्रत्येक गावागावात राबवायला हवा व हा उपक्रम राबवण्यासाठी गावातील राजकारण सोडून सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे ग्रुप तयार करुन कार्यक्रम राबवावेत जेणेकरून गोरगरिबांची व निराधारांची दिवाळी गोड होईल.
COMMENTS