अबब....खंडणी बहाद्दर न प च्या खुर्चीवर...? 5 लाख दंड व तक्रारी करून वेठीस धरल्याचा न्यायालयाचा ठपका

अबब....खंडणी बहाद्दर न प च्या खुर्चीवर...? 5 लाख दंड व तक्रारी करून वेठीस धरल्याचा न्यायालयाचा ठपका   माजलगाव/भास्कर गिरी       80 वर्षीय कौ...

अबब....खंडणी बहाद्दर न प च्या खुर्चीवर...?


5 लाख दंड व तक्रारी करून वेठीस धरल्याचा न्यायालयाचा ठपका


 


माजलगाव/भास्कर गिरी


 


    80 वर्षीय कौशल्याबाई सुखलाल बजाज यांना बायपास ला गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळू नये या साठी कोर्टात खोटी तक्रार दाखल करून वेठीस धरल्या प्रकरणी 3 एप्रिल 2019 रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने 5 लाख रु दंड व यापुढे खोट्या केस दाखल करून आपले इप्सित साध्य करण्याचे धंदे बंद करा असा निकाल ज्याच्या विरोधात दिला त्या शेख मंजूर शेख चांदसाब यांना माजलगाव न प च्या खुर्चीवर आ प्रकाश सोळंके यांनी लादले आहे.मात्र यामुळे शहरात आ सोळंके विरुद्ध संताप व्यक्त आहे.


         80 वर्षीय कौशल्या बाई सुखलाल बजाज यांची सर्व्हे न 382 मध्ये जमीन आहे.राष्ट्रीय महामार्ग 222 या जमिनीतून गेला असता या जमिनीशी काडीचा ही सबंध नसणाऱ्या काल नगराध्यक्ष पदी विराजमान झालेल्या शेख मंजूर शेख चांदसाब यांनी औरंगाबद उच्च न्यायालयात 80 वर्षीय वृद्ध महिलेस केवळ दोन पैसे मिळावे या हेतूने त्रास देणारी याचिका दाखल केली होती.या प्रकरणात 3 एप्रिल 2019 रोजी निकाल लागला होता.यात न्यायालयाने स्पष्ट शब्दात खोट्या तक्रारी दाखल करून लोकांना वेठीस धरणे बंद करा असा निकाल देत उलट 5लाख रु दंड ठोठावला होता.सर्व सामान्य जनतेस 80 वर्षीय अतिअल्पसंख्याक वृद्ध महिलेस त्रास देणाऱ्या शेख मंजूर शेख चांदसाब यास नगराध्यक्ष पदी बसवून आ प्रकाश सोळंके यांनी एक प्रकारे सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी च नगराध्यक्ष पदावर बसवले की काय अशी चर्चा सुरू आहे.आ सोळंके च्या या निर्णयामुळे लहान लहान समुदायात भीतीचे वातावरण आहे. पद नसताना आपल्या स्वार्थासाठी सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या नगराध्यक्ष शेख मंजूर शेख चांदसाब यांच्या कडून यापेक्षा जास्त अपेक्षा माजलगावकराना नाहीत


      


छोट्या जाती आ सोळंकेचे टार्गेट..?


    आ प्रकाश सोळंके यांना विधानसभेला 4000 मताची लीड देऊन माजलगावकरं पाश्चाताप व्यक्त करत असून ब्राम्हण,वाणी ,कोमटी,मारवाडी आदी लहान लहान व्यापारी समुदाय आ सोळंके यांचे टार्गेट आहे का अशी चर्चा कालपासून माजलगाव शहरात जोर धरत आहे.


माजलगाव कराचे भाग्य फुटले


   वेगवेगळ्या प्रकरणात लोकांना त्रास देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला व 420 प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आ प्रकाश सोळंके यांनी जाहीर केल्यानंतर एका आरोपीस नगराध्यक्ष पदी कसे बसवले जात आहे यावर आक्षेप न घेतला गेल्यामुळे माजलगावकराचे भाग्य फुटले म्हणण्याची वेळ आली आहे



COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group