महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिकारी यांच्या बदल्या केल्या असुन पोलिस निरिक्षक पंडित कच्छवे यांच्या रूपाने पुन्हा एकदा हिंगोली पोलिस दलाला एक कर्तबगार अधिकारी लाभला ते सोमवारी पोलिस अधिक्षक कार्यालयात हजर झाले आहेत.
पोलिस निरिक्षक पंडित कच्छवे यापुर्वी हिंगोली जिल्ह्यातील मोठे पोलिस ठाणे असलेल्या आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात दिड वर्षे सेवा बजावत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच गुन्हेगार व अवैध धंदेचालक यांचे कर्दनकाळ ठरले होते. पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी नांदेड रेंज मधील लोहा,नांदेड ग्रामीण,विमानतळ, उस्माननगर, लिंबगाव,आखाडा बाळापुर आदि पोलिस ठाण्यात उत्कृष्ट ठाणेदार म्हणुन कामगिरी बजावली आहे. 15 वर्षे पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावल्याबदल राष्ट्रपती पदकाने त्यांचा गौरव हि करण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट सेवे बद्दल त्यांनी पोलिस महसंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे. पंधरा वर्षाच्या सेवेत कुठलीही तक्रार नाही, शिक्षा नाही, विभागीय चौकशी नाही असा स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी हिंगोलीत हजर झाला आहे. सन 2014/15 रोजी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. हिंगोलीत अशा कर्तबगार अधिकारी यांना आता हिंगोली जिल्ह्यातील कुठले पोलिस स्टेशन किंवा अधिक्षकांची अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या एलसीबी वर वर्णी लागणार का पोलिस अधिक्षकांच्या आदेशाकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS