*मनसेच्या महिला मोर्चाची जिल्हा अधिकारी यांनी घेतली दखल*.


 


*केज प्रतिनिधी*


बचत गटांच्या कर्जाची सक्तीने वसुली न करण्याचे जिल्हा अधिकारी यांचे मायक्रो फायन्सस व बँकांना आदेश


 


कोरोणा मुळे अनेकांचे छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले आहेत अनेक व्यापारी अर्थीक संकटात सापडले आहेत.महिला बचत गटांच्या महिला देखील या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत,छोट्या मोठ्या व्यवसायासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले परंतु कोरोणा मध्ये सर्व उद्योग ठप्प झाले घेतलेले कर्ज फेडणे बचत गटांच्या महिलांना कठीण झाले होते.


    बचत गटांच्या महिलांचे कर्ज माफ करण्यात यावे व मायक्रो फायन्सस व बँकान कडून होणारी सक्तीची कर्ज वसुली थांबवावी व बचत घटनांच्या महिलांच्या इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी केज तहसील कार्यालयावर महिला मोर्चा काढला होता.या मोर्चाची दखल घेत बीड चे जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांनी आज बचत गटांच्या महिलांकडून कर्जाची सक्तीने वसूली न करण्याचा आदेश बीड जिल्ह्यातील बँक व खाजगी फायनान्स कंपन्यांना काढला आहे.


 महिलांचे बचत गटांचे कर्ज माफ व्हावे व मायक्रो फायन्सस सक्तीने करत असलेली कर्ज वसुली तात्काळ थांबवावी 


यासाठी मनसे च्या वतीने २९ ऑक्टोम्बर रोजी केज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चा ची दखल घेत बीड जिल्हा अधिकारी यांनी महिला बचत गटांच्या महिलांकडून सक्तीने कर्जाची वसुली करू नये असा आदेश काढला आहे.


 बचत गटांच्या महिलांना धीर देणारा आदेश काढल्या बद्दल मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,शेतकरी सेना केज तालुका अध्यक्ष बाबुराव ढाकणे,तालुका उपाध्यक्ष निरीन बोराडे,रजनीकांत पुरी,गिविंद हाके,गणेश काळे,तालुका संघटक राजेभाऊ धायगुडे आदींनी जिल्हा अधिकारी यांचे आभार मानले आहेत.


टिप्पण्या