संतोष सुरोशे हादगाव तालुका प्रतिनिधी
लिंगापुर ता.हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे शेतकरी माहितीपत्रकाचे प्रकाशन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती तपासणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी त्यानंतर जमिनीमध्ये आवश्यक ती द्यायची खते या माहितीच सविस्तर माहितीपत्रिका तयार करण्यात आली, या माहिती पत्रकाचा शेतकऱ्यांना आपली शेती करताना फायदा होईल अशी माहिती राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी दिली आहे,माती परीक्षण केंद्राच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना माहिती पत्रक वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, नाबार्ड'चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. राजेश दुर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर,श्री सोनटक्के,श्री.सुखदेव, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.देविकांत देशमुख,पिंटू पाटील गाढे, श्री गोरे,अर्जुन गाढे, तन्मय कदम, गायकवाड कृषी विभागातील अधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS