- @ आडा येथील रस्त्याला मुहूर्त कधी मिळेल?@
- *ग्रामस्थांची या रस्त्याबाबत ची दैना ही संपता संपेना*
- *संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधी तात्काळ लक्ष देण्याची ग्रामस्थांकडुन मागणी*
- संतोष सुरोशे हदगाव तालुका प्रतिनिधी
हादगाव तालुक्यातीलआडा
छोट्याश्या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत बिकट व दयनीय अवस्था झाली असल्यामुळे या गावातील नागरिकांनी हा रस्ता होणार का नाही असा सूर निघत असून याविषयी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की निवघा बाजार येथून जवळ असलेल्या धानोरा तू रुई दरम्यानअसलेल्याआडा
गावातील नागरिकांनी आडा फाटा ते गावात जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. बर्याच वर्षांपूर्वी या गावात जाण्यासाठी या रस्त्याचे काम करण्यात आले होते परंतु रस्त्याचे काम केल्यामुळे या रस्त्याच्या काम अत्यंत दर्जाहीन केल्यामुळे कमी कालावधीमध्ये हा रस्ता खराब झालाआहे .या रस्त्याच्याकामावरील गुत्तेदार व ठेकेदारांनी हे काम थातूरमातूर पद्धतीने करून आपले खिसे भरले असल्यामुळे या रस्त्याचे बारा वाजलेले आहेत. तसेच या रस्त्यावर मजबुतीकरण करण्यात आले होते परंतु कमी गिटी व मुरूम कमी व माती जास्त असलेला मुरूम या रोडवर टाकून आंधळा का साजरा केला करून हा रस्ता येथील गावकऱ्यांच्या माथी मारला आहे .त्यामुळे कमी कालावधीतच या रस्त्यावरील मुरूम व गिटी उघडी पडून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरून जात असता विहरण तर सोडाच सोडा परंतु पादचाऱ्यांना सुद्धा चिखलातून वाट काढत त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .त्यामुळे येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित कार्यालयात व लोकप्रतिनिधी जवळ या रस्त्याविषयी गाऱ्हाणे मांडले परंतु तुमचा हा रस्ता तत्काळ करून देऊ असे नुसते पोकळ आश्वासनाशिवाय येथील ग्रामस्थांना काही मिळाले नाही .गावात जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे हे गाव महाराष्ट्र राज्यात व भारत देशात आहे की नाही आहे की अशी खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांची दैन्यावस्था लक्षात घेऊन संबंधित विभागानने व लोकप्रतिनिधीने तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ यातून जोर धरत आहे.
COMMENTS