-----------------------
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय अंबुलगा (बु) यांच्या वतीने माजी राष्ट्रपती ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या (दि .१५)जन्म दिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मारोती महाराज अंबुलगेकर हे होते तर यावेळी प्रमुख उपस्थिती जि .प .प्रा .शाळेचे सेवानिवृत मुख्याध्यापक कांबळे सर , सेवानिवृत मुख्याध्यापक उमाकांत गुरूजी मोतेवार ,भाऊराव पा.कदम, पांडुरंग पा.कदम , पांडुरंग उलिगडे ,पत्रकार विट्ठल कल्याणपाड , अमोल नागमवाड ,बालाजी कलेटवाड यांची होती.यावेळी अध्यक्षीय समारोप करतेवेळेस मारोती महाराज अंबुलगेकर म्हणाले की नियमित वाचनाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो असे ते म्हणाले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांबळे सर यांनी तर शेवटी अमोल नागमवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS