आष्टी( दादासाहेब बन)
आष्टी शहरातील एमआयडीसी रोड जुन्या हैदराबाद बँक शेजारी शेकापुर चे सरपंच प्रवीण शिंदे यांनी फक्त महिला वर्गासाठी भव्य श्रेया कलेक्शन व साडी सेंटर सुरू केले आहे .या कलेक्शनचा शुभारंभ विजयादशमी या शुभमुहूर्तावर आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. आष्टी शहरांमध्ये फक्त महिलांसाठी व लहान मुलांसाठी स्वतंत्र वस्त्र दालन प्रथमच सुरू केल्याने आष्टी तालुक्यातील महिला व मुलांसाठी जामखेड व नगर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही.फुंदे यांनी भव्य असे वस्त्र दालन सुरू केल्याने मनसोक्त खरेदी करण्याचा आनंद आता महिलांना घेता येणार आहे .या श्रेया कलेक्शन मुळे आष्टी शहराच्या वैभवामध्यें नव्याने भर पडली आहे. या शुभारंभप्रसंगी आष्टी शहरातील व्यापारी संतोष शेठ मेहेर, विजयशेठ मेहेर ,तालुका असोशियन चे अध्यक्ष संपत शेळके,शार्दुल टिटा ,अँड साहेबराव मस्केे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब लटपटे ,नगराध्यक्ष भारत मुरकुटे ,उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर ,शहादेव गिते,संतोष मुरकुटे ,श्रीपाद बळे दादा पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार दादासाहेब बन, शरद तळेकर ,सतीश पोकळे,जफर शेख संतोष टकले आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत वकील संघाचे माजी अध्यक्ष एडवोकेट काशिनाथ फुंदे ,सरपंच प्रवीण फुंदे ,ॲडव्होकेट राजेंद्र फुंदे यांनी केले .
COMMENTS