*मांजरा धरणाचे कार्यालय धरणावर आणा अन्यथा धरणावर फिरकू देणार नाही:-राहुल खोडसे* *आमदार नमिता मुंदडा यांना निवेदन*

  *केज प्रतिनिधी*   केज तालुक्यातील मांजरा धरणाचे कार्यालय धरणावर करा अन्यथा धरणावर येणे विसरा आशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने ...


 


*केज प्रतिनिधी*


 


केज तालुक्यातील मांजरा धरणाचे कार्यालय धरणावर करा अन्यथा धरणावर येणे विसरा आशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे


केज तालुक्यातील मांजरा धरण हे बीड,उस्मानाबाद सह लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारे एकमेव धरण असून या धरणाचे उद्घाटन 1980 मध्ये झालेले असून याची साठवण क्षमता 8 tmc आहे संबंधित धरणाच्या निर्मिती वेळी धरणाचे मुख्य उद्दिष्ट सिंचनासाठी केलेले होते कालांतराने दुष्काळ आणि कमी पाऊसकाळ होत चालल्याने धरणावर सिंचन कमी आणि लातूर जिल्ह्याला पिण्यासाठी जास्त होत आहे या धरणाच्या निर्मिती झाली तेव्हा धरणाचे मुख्य कार्यालय धरणावरच होते परंतु काही राजकिय हेतूने येथील कार्यालय लातूर येथे हलवण्यात आले त्यामुळे ज्या बीड जिल्ह्यातील 70% व उस्मानाबाद जिल्ह्यातील 30% शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आशा शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा *धरण उशाला कोरड घश्याला* अशी अवस्था झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कुठलाही कागद काढायचा झाला तर त्या शेतकऱ्यांना लातूर येथील कार्यालयात जावे लागत असून तेथील अधिकारी देखिल काम करत नाहीत वरतून आर्थिक लूट होत असून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर धनेगाव धरणाचे मुख्य कार्यालय हे धरणावर आणावे अशी विनंती संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आणि हे कार्यालय बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत नसेल तर धरणाकडे बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी धरणाकडे फिरकायचे देखिल नाही असे या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, अमर घाडगे,नायगाव चे सरपंच विवेक खोडसे, धनेगाव सरपंच सुहास गुजर,दिलीप पाटील,विलास खोडसे, प्रवीण खोडसे,विजयकुमार गुजर,बाळासाहेब जाधव,सुजय पकवे,सतीश शिंदे,प्रताप सोमवंशी,माऊली खोडसे,राहुल आवाड, शिवाजी आवाड,दिलीप भिसे,दत्तात्रय खोडसे,रामदास गव्हाणे,गणेश गुजर,रोहित अपिटे आदींच्या स्वाक्षरी आहेत


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel