केज प्रतिनिधी.
कोरोना आणि त्यामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे महिला बचत गटांची अवस्था बिकट आहे,बचत गटांचा व्यवसाय ठप्प असल्यामुळे कर्जाचा विळखा बसला आहे. ही कर्ज माफ व्हायलाच पाहिजेत अन्यथा बचतगटातील महिला पुन्हा उभ्याच राहू शकणार नाहीत,स्वावलंबी होऊ शकणार नाहीत. ह्याच मागणीसाठी मनसे महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार राजू पाटील साहेब,मनसे नेते अभिजित पानसे साहेब,मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष व सरचिटणीस दिलीप धोत्रे साहेब,मनसे चे उपाध्यक्ष जावेद शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केज येथे दिनांक २९ ऑक्टोबर वार गुरुवारी रोजी मोर्च्या काढण्यात येणार आहे.
मोर्च्याच्या पूर्व तयारी साठी आज केज येथे बचत गटांच्या प्रमुख महिलांची बैठक मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालूका अध्यक्ष कल्याण केदार यांच्या उपस्थिती पार पडली.
COMMENTS