केज : केज तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सत्कार केला.
महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचा दसर्या दिवशी वाढदिवस असतो. बोराडे महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य, नुकतीच त्यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी निवड आणि संत तुकाराम महाराजांचे दर्शन हा योग साधून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे येऊन बोराडे महाराजांना शुभेच्छा देवून सत्कार केला. याप्रसंगी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोराडे महाराजांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी संत तुकोबाराय पावनधाम संस्थानच्या वतीने धनंजय मुंडे यांचा सत्कार केला. यावेळी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद अध्यक्षपती शिवाजी सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, नगरसेवक बबन लोमटे, कौडगावचे सरपंचपती तथा राष्ट्रवादीचे नेते विष्णू चाटे, भागवत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
COMMENTS