==========================
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव शहरातील तिरंगा दुर्गा महोत्सव राजूर हनुमान मंदिरच्या वतीने कोरोनाच्या पर्शवभूमीवर काळाची गरज लक्षात घेऊन आयोजीत रक्तदान शिबीरात ६१ जनांनी रक्तदान केले. नायगाव शहरातील तिरंगा दुर्गा महोत्सव तर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाचे प्रमुख तथा आयोजक माधव पाटील कल्याण यांच्या पुढाकारातून दि.२२ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराचे उदघाटन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, माजी जि. प .सदस्य बालाजी बच्चेवार, जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, नगरसेवक देवीदास पाटील बोमनाळे, राहुल पा. नकाते, सुभाष पाटील कल्याण, शिवाजी पाटील कल्याण, गजानन पा. चव्हाण, डाँ. प्रा.जीवन चव्हाण , कैलास भालेराव , दत्ता पा.नारे, प्रदीप देमेवार , पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, बाळासाहेब यांची प्रमुखउपस्थीती होती.
नायगाव शहरातील तिरंगा दुर्गा महोत्सव निमित्त गेले दहा वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात यायचे त्याचाच एक भाग म्हणुन 22आॉक्टोंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड च्या मदतीने तिरंगा दुर्गा महोत्सवाच्या वतीने राजुरा मारोती मंदीर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरास ६१ जनांनी स्वयंस्फुर्तपणे रक्तदान केले . भाजपचे युवा नेते माधव शंकरराव पा.कल्याण यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास युवकांनी मोढ्या प्रमाणात सहभाग नोंदवला .
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक माधव शंकरराव पा.कल्याण , संजय पाटील कल्याण, शिवाजी देशमुख, राजू पाटील कल्याण,पंडित पाटील कल्याण, शिवानंद गोरे, माधवराव पाटील आनेराये, संतोष पाटील कल्याण, ओमकार पांचाळ, रोहित पाटील जिगळेकर , बालाजी रामरुपवाड सर, गणेश कोठाळे, सोमनाथ महाराज, यानी परिश्रम घेतले
COMMENTS