नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) तालुक्यातील कुंटूर येथे असलेल्या शनी मंदिर येथे ८ वर्षांपासून येथे अनेक तालुक्यातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी दर शनिवारी येत असतात परंतु त्या शनी मंदिराला जाण्यासाठी खडतर रस्ता असल्याने भक्तांना त्रास सहणं करावा लागत आहे त्याकरिता होणारा त्रास लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते पवनकुमार पुट्ठेवाड कुंटूरकर यांनी शनी मंदिराला जाणा-या सिमेंट रस्त्यासाठी
खासदार व आमदार यांच्या कङे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सदर मंदिराची स्थापना होऊन जवळपास ८ ते ९ वर्षाचा लकालावधी होत असून या शनी मंदिराच्या ठिकाणी दर शनिवार व अमावश्या या दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन भाविक भक्ता कडून केले जाते, महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होत असते. म्हणून भक्तांची होणारी परवड लक्षात घेऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार राजेश पवार यांनी कुंटूर येथील शनी मंदिराला जाण्यासाठी सिमेंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवनकुमार पुट्ठेवाड यांनी केली आहे.
COMMENTS