केज प्रतिनिधी. केज तालुका कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला किसान दिनानिमित्त केज तालुक्यातील मौजे जवळबन येथे या कार्यक्र...
केज प्रतिनिधी.
केज तालुका कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला किसान दिनानिमित्त केज तालुक्यातील मौजे जवळबन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये शेतकरी महिला सौ हिराबाई दिगंबर करपे यांचा सन्मान करण्यात आला तसेच कृषी विभाग व आत्मा यांच्या योजना परसबाग महत्व व महिला यशोगाथा रबी हंगाम हरभरा व ज्वारी पीक उत्पादन तसेच उमेद विभाग यांच्या योजना यांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमा साठी सावित्रीबाई फुले महिला गटातील महिला सदस्य जवळबन. श्री अंभोरे व्ही बी मंडळ अधिकारी, श्रीमती घुले व्ही व्ही मंडळ अधिकारी यू वडगाव, श्रीमती माचवे एस एस कृषी सहाय्यक,श्रीमती अलका शिंदे उमेदतज्ञ,श्री योगेश पाटील बीटीएम श्री रमेश कांबळे कृषीतज्ञ संदीप करपे इत्यादी उपस्थित होते
COMMENTS