- @विटा रेती सिमेंट गजाळी
- दुकानदारांच्या घराभोवती चकरा@
- संतोष सुरोशे हदगाव तालुका प्रतिनिधी
हदगाव तालुक्यात रमाई आवास योजनेचे पाच ते सहा महिन्यापासून हप्ते रखडल्यामुळे विटा रेती सिमेंट गजाळी इत्यादी बांधकाम साहित्य घरकुल हप्त्याच्या भरोशावर आणल्यामुळे हप्त्याची रक्कम न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या घरी येऊन दुकानदार पैशाचा तगादा लावीत असल्यामुळे लाभार्थी पुरता वैतागून गेला आहे़
सविस्तर वृत्त असे की अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचे राहणीमान उंच व्हावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये ते त्यांच्या स्वतःच्या जागेवर घर बांधून देण्यासाठी रमाई आवास योजना राबवली जाते हदगाव तालुक्यात रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नव बौद्धांसाठी घरकुल आले आहेत त्यामुळे घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनेकांनी आपली घरे बांधण्यास सुरुवात केली काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्याच्या भरोशावर विटी रेती गजाळी सिमेंट इत्यादी बांधकाम साहित्य उधारीवर आणले काही लाभार्थ्यांनी सावकारी कर्ज उसनवारी करून बांधकाम साहित्य खरेदी केली आहे परंतु संपूर्ण देशात कोरोना या महा रोगामुळे रमाई आवास योजनेच्या घरकुलाचे जवळपास पाच ते सहा महिन्यापासून हप्ते मिळाले नाहीत त्यामुळे घर तर झालेच नाही उसनवारी करणारे सावकार बांधकाम साहित्य दुकानदार इत्यादी सतत लाभार्थ्यां कडे पैशासाठी तगादा करीत आहेत
घरकुलाची रक्कम अल्प असल्यामुळे काही लाभार्थ्यांनी जवळील पैसा व काही लाभार्थ्यांनी खाजगी फायनान्स काढून या घरकुल मध्ये पैसे आटवले असल्यामुळे कोरणा या महाभयंकर बिमारी मुळे गोरगरिबांच्या हाताला काम नसल्यामुळे अनेक लाभार्थी कुटुंबावर खरोखरच उपासमारीची वेळ आली आहे परंतु महत्त्वाची आश्चर्याची बाब म्हणजे संचारबंदी असताना सुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे नियमित हप्ते मिळत आहेत आणि अनुसूचित जाती व नव बौद्धांच्या रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांची हप्ते कोरोना या रोगामुळे मुळे रखडले आहेत असे सांगण्यात येते त्यामुळे शासन सुद्धा आजही जातिभेद करताना दिसत असल्याचे काही लाभार्थ्यांनी खंत व्यक्त केली आहे याविषयी गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता या योजनेचे हप्ते वरूनच आले नाहीत असे वारंवार सांगण्यात येत आहे
त्यामुळे शासनाने तात्काळ या रमाई योजनेचे त्याची तात्काळ द्यावे अन्यथा वीट रेती सिमेंट गजाळी इत्यादी बांधकाम साहित्य दुकानदाराच्या पैशांच्या तगा दयामुळे कामावर खरोखर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशी खंत रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीं जवळ व्यक्त केली
COMMENTS