प्रतिनिधी- शेख आरीफ
नांदेड:-दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध उपक्रम घेऊन नांदेड येथील सुप्रसिद्ध दंतरोग व मुखरोग तज्ञ, किसान ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष डॉ. दत्ता यशवंतराव मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोना सारख्या महामारी मुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्ण देगाववासीयांना मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाला शेतकरी शेतमजूर पंचायत चे राज्य उपाध्यक्ष श्री. बळवंत मोरे, मा. आ. वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र श्री. रविंद्र चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम,वीर भगतसिंघ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, श्री. किशनराव मोरे, माजी सरपंच श्री. उत्तम मोरे, जीवनदायी योजनेचे श्री. शरद पवार, पंकज चव्हाण, विलास पाटील धूप्पेकर, NSUI चे तालुका अध्यक्ष श्री. सूरज पा. शिंदे, अमोल पाटील सातेगावकर ,प्रजासत्ताक पार्टी चे राहुल गायकवाड स्वराज्य मित्र परिवाराचे बालाजी धनजंकर व ईतर मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तदनंतर शिवलिंग शिवाचार्य श्री. अहमदपुरकर महाराज यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेश मोरे यांनी केले तर समायोजित भाषणे व मार्गदर्शन श्री. रविंद्र चव्हाण, इंजि.शिवाजीराजे पाटील बाभळीकर, डॉ. सुरेश कदम यांची झाली. आभार प्रदर्शन डॉ. दत्ता मोरे यांनी मांडले. त्यात सर्वमान्यवरांचे कोरोना पार्श्वभूमीवर उपस्थित राहिल्या बद्दल आभार व्यक्त केले तसेच संयोजन समिती चे ही मनपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
कोरोना च्या काळात घ्यावयाची काळजी व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा, प्राणायाम, सोशल डिस्टंसिन्ग व इंमुन्नी बूस्टर चे महत्व डॉ. दत्ता मोरे यांनी विशद केले. आणि उपस्थितांना मास्क, सॅनिटायझर आणि अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समिती ने भरपूर मेहनत घेतली त्यात माजी सरपंच श्री. उत्तमराव मोरे, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्री. बळवंत मोरे, श्री. माणिक मोरे, श्री. विठ्ठल मोरे, श्री. राजेश मोरे, लक्षरं श्री. भगवान मोरे, श्री. बाबू नरवाडे, दत्ता मोरे,विजय मोरे, श्रीनिवास पांचाळ,संजय मोरे , मंगेश पुयड, श्री. सचिन गायकवाड, श्री. बसवेश्वर गुडपे, श्री. शेषराव रोडे व समस्त गावकरी मंडळीने घेतले.
COMMENTS