संतोष सुरोशे हदगाव तालुका प्रतिनिधी
हादगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी नवीन ,विभक्त ,तसेच द्वितीय शिधापत्रिकेसाठी तहसील कार्यालयात अर्ज करून आठ ते नऊ महिने होऊन सुद्धा अद्याप शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका मिळत नाही.
सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील शेकडो नागरिकांनी नवीन शिधापत्रिका, द्वितीय शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका साठी अर्ज दाखल केले आहेत परंतु आलेल्या अर्जाची कसल्याही प्रकारची दखल येथील पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी घेत नाहीत आलेल्या अर्जाचे गठ्ठे बांधून पुरवठा विभागात धूळ खात पडून आहेत परंतु एखाद्या अर्जदाराने कर्मचाऱ्यास ची आर्थिक देवाण-घेवाण केल्यास ताबडतोब पाच ते सात दिवसात शिधापत्रिका मिळते असे काही अर्जदारांनी सांगितले त्यामुळे गरीब असलेल्या नागरिकांचे अर्ज तसेच धूळखात या विभागात पडून आहेत या विभागात पडून आहेत मौजे पिंगळी येथील जनाबाई देविदास गव्हाणे नामक महिलेने दिनांक 11/2/2020 रोजी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता परंतु अर्जदार महिलेने नंतर दीड महिन्याला पुरवठा विभागात येऊन सिद्ध पत्रिके बाबत विचारणा केली असता या महिलेला या विभागातील कर्मचाऱ्याने शिधापत्रिकेसाठी पंधरा दिवसांनी या असे सांगितले तेव्हा सदर महिला पंधरा दिवसाला या विभागात आल्यानंतर सध्या कार्ड उपलब्ध नाहीत कार्ड आल्यानंतर तुम्हाला ते मिळतील उडवाउडवीची उत्तरे देऊन सदर महिलेला पाठवले तसेच सदर महिला या विभागात आठ महिन्याच्या कालावधीनंतर ही या महिलेला अद्याप शिधा पत्रिका मिळाली नाही याविषयी पुरवठा विभागातील श्री चौधरी साहेब यांच्याकडे विचारणा केली असता अध्याप कार्ड आले नाहीत असे सांगण्यात आले शासनाच्या नियमाप्रमाणे अर्जदाराने शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर एका महिन्यात अर्जदारास सिद्धा पत्रिका मिळते परंतु हदगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील असंख्य नागरिकांच्या चकरा होत आहेत यातील काही अर्जदारांना दवाखान्यासाठी सिद्ध पत्रिकेची गरज आहे या विभागातील कर्मचाऱ्यांना या बाबींचे काही देणे घेणे नाही त्यामुळे या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कुणाचा अंकुश आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे या बाबींचा वरिष्ठांनी तात्काळ विचारकरूनअर्जदारास दयाव्या .
COMMENTS