किल्ले धारूर ( प्रतिनिधी )
शिवसंग्रमा संघटना किल्ले धारूरच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महत्वाच्या मागणीनुसार सरकारने अंमलबजावणी कराव्यातचे निवेदन तालुका अध्यक्ष कृष्ण उंकडे यांनी तहसीदार यांना देण्यात आले.
सध्याचे सरकार येवुन ८-९ महिने होत आले आहेत, या कालावधीमध्ये मराठा समाजाचे प्रमुख
आणि महत्वाचे विषया बाबत आपण आणि आपल्या मंत्री मंडळामधील कोणीही जाणीवपुर्वक लक्ष घातले नाहर, समाजाच्या प्रश्नांवर कधी बैठक घेतली नाही, निर्णय घेण्याचा तर प्रश्नच नाहर, पुर्णपणे सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे हे सर्व समाजाच्या निदर्शनास येत आहे. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे या करिता समाजाला आवाज
उठवायला लागला तेव्हा कुठे आपण आणि मंत्रीमंडळ, उपसमितीचे अध्यक्ष ना. अशोकराव चव्हाण यांनी लक्ष घातले. एक-दोन व्हिडीओ कॉन्स्फरिंग व्दारे बैठका घेतल्या पण बैठकीमध्ये वेगळे शब्द दिले गेले आणि प्रत्यक्ष वेगळे घडत आहे. म्हणुन मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत मोठी चिंता, काळजी वाढत आहे. म्हणुन सरकारचे आमच्या प्रश्नांकडे लक्ष वेधुन घ्यावे व आरक्षणाची शासनाने काळजी घ्यावी, मागील सरकारने मा. उच्च न्यायालयामध्ये टिकवलेल आरक्षण आपल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवावे म्हणुन आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनाचा प्रथम टप्पा म्हणुन आम्ही या निवेदनाव्दारे आपले लक्ष वेधुन घेत आहोत व
आरक्षणासहीत मराठा समाजाचे सर्व प्रश्न त्वरीत मार्गी लावावे, जर प्रश्न मार्गी नाही लागले तर
शिवसंग्रमा संघटना किल्ले धारूरच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल याची दक्षता आपण
घ्यावी निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS