परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
डिजिटल जगात भारतीय आता डिजिटल होण्याकडे मार्गस्थ होत आहे या पार्श्वभूमीवर बाहेर पडू नये यासाठी प्रयत्नशील आहे बँकेचे व्यवहार बँकेत न जाता डिजिटल करता यावेत यासाठी अनेक ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहेत परंतु गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरात आणि तालुक्यात या सर्व एप्लीकेशन वरून ट्रांजेक्शन करत असताना ग्राहकांना अडचणी येत आहेत हे ॲप्लिकेशन वापरून कोणाचेही व्यवहार होत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव घराबाहेर पडावे लागत आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार होत नसल्यामुळे बाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
भीम यूपीआय गुगल पे फोन पे अशा स्वरूपाच्या तांत्रिक दोष निर्माण झाल्याने नागरिकांचे व्यवहार होत नाहीत हे व्यवहार झाले तर बहुतांश प्रमाणात नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडणार नाही परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ॲप बंद असल्यामुळे व्यवहार होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कोरोना धोका वाढत असताना दुसरीकडे या तांत्रिक अडचणीमुळे घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे कोणता धोका पत्करायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
COMMENTS