माजलगाव प्रतिनिधी
माजलगाव शहरा सह तालुक्यात कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण निघाले आहेत त्या-त्या ठिकाणचा परिसर शील केले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असतांना बीड जिल्ह्यात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून माजलगाव शहरा सह तालुक्यात कोरोना विषाणू चे रुग्ण सापडत असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरचे मोठ मोठे कॉम्प्लेक्स आज दुपारी नगर पालिकाने पत्रे मारून शील केले आहेत. आता तरी माजलगाव शहरातील नागरिकांने काळजी घेण्याची गरज आहे. नसता बीड,अंबाजोगाई, परळी सारखे कोरोना चे रुग्ण सापडायला वेळ लागणार नाही म्हणून कोरोना पासून वेळीच सावध राहणे गरजेचे आहे. नागरीनकाने हलगर्जीपणा केला तर माजलगाव तालुका कोरोनाच्या विळख्यात सापडायला वेळ लागणार नाही म्हणून वेळीच नागरिकाने स्वतःची काळजी घेऊन शासनाला सहकार्य करण्याची सध्या तरी गरजेचे आहे.
---------------------------
माजलगाव शहरात मोटरसायकल वर विनाकारण फिरणारे काही नागरिक तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत आहेत यांच्या कडून काळजी घेणाऱ्या नागरिकांना धोका नाकारत येत नाही म्हणून पोलीस प्रशासनाने यांच्या वर कारवाई करून दंड आकारून आवर घालावा असे नागरिकांत बोलले जात आहे.
COMMENTS