तहसीलदारानां दिले निवेदन
धर्माबाद (अहमद लड्डा)
मालेगाव येथे भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाज कंटकावर गुन्हे दाखल करुन गावातुन बेदखल करणे विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी तहसीलदाराना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे लिहिण्यात आले की मालेगाव ता. लोहा जि. नांदेड ह्या गावातील भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबना करणार्या माथेफिरु समाज कंटकासस शासनाने लवरात लवकर अटक करुन गुन्हे दाखल करुन त्यांना गावातुन बेदखल करून तांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन समाजातल्या वेगवेगळ्या जाती धर्म माननार्या लोकांना जाती पातीच्या पलीकडे जावुन सर्व धर्म समभावाची भावना बाळगणार्या लोकांनमध्ये तिव्र संताप होत आहे. त्यामुळे विटंबना करनार्या लोकांवर कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्मान सेने तर्फे अंदोलन करण्यात येइल.
धर्माबाद शहर व परीसरात वाढता कोरोना संसर्ग पाहता सोशल मीडीयाच्या माध्यमातुन निवेदन देत आहे मा. साहेबानी स्विकार करने विषयी विनंती केली आहे व याचे प्रतिलीप
मा. जिल्हाअधीकारी साहेब जिल्हाअधीकारी कार्यालय नांदेड,
मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन धर्माबाद ला मनसे अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांच्या तर्फे देण्यात आले आहे.
COMMENTS